नाशिक - कांद्याच्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या भावात आज अखेर घसरण झाली आहे. देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावांसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत.
एकीकडे कांद्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, तर दुसरीकडे भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिली, तर अजून दर कमी होतील, असे व्यापारी सांगत आहेत. सरकारने कांदा साठवणूक करण्याला बंधन घातल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कांदे खरेदी करणे शक्य नाही. अशा स्थितीत येत्या काही दिवसात बाजारपेठेत कांद्याची आवक वाढून भाव कमी होण्याची शक्यता आहे.