नवी दिल्ली- भारत स्वच्छ उर्जेच्या मोहिमेवर एकत्रित विचारधारणेतून काम करत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ते पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान परिषदेत बोलत होते. ही परिषद इंटरनॅशनल सोलर अलायन्सने (आयएसए) आयोजित केली आहे. भविष्यात एक दिवस ऊर्जा ही मोफत होईल, अशा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, की हे पुढील पिढ्यांना स्वच्छ ऊर्जामिळण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार आहे. ऊर्जा स्वच्छ असण्याशिवाय पर्याय नाही. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे करावे लागेल. एकट्या भारताने ७४५ गिगावॅट क्षमतेची सौरउर्जा तयार करण्याची क्षमता दाखविली आहे. आपण इतर जगालाही ऊर्जा पुरविणार आहोत. भविष्यात जगभरात ग्रीड जोडल्याचे दिसणार आहे.