नवी दिल्ली- ओला इलेक्ट्रिक कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत जुलैमध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी कंपनीकडून हायपरचार्जर नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. या नेटवर्कमध्ये देशातील 400 शहरांमध्ये 1 लाख चार्जिंक पॉईंट सुरू करण्यात येणार आहे.
गतवर्षी ओलाने तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यासाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. या कारखान्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 10,000 नोकऱ्या तरुणांना मिळू शकणार आहेत. तर हा कारखाना जगातील सर्वात मोठा स्कूटरची निर्मिती करणारा कारखाना असणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कारखान्यामधून वार्षिक 20 लाख स्कूटरची निर्मिती होऊ शकणार आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सॅनिटायझरसह स्वच्छता उत्पादनांच्या मागणीत वाढ