नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) खोट्या बिलांमधून फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा जीएसटी अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमध्ये बोगस २३ कंपन्यांच्या माध्यमांमधून ७,८९६ कोटी रुपयांची सरकारची फसवणूक करण्यात येत होती.
केंद्रीय प्राप्तिकर कर चुकवेगिरी प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांना हजारो कोटी रुपयांची खोटी जीएसटीची बिले आढळली आहेत. यामध्ये १,७०९ कोटी रुपयांच्या खोट्या इनपूट क्रेडिट टॅक्सच्या बिलांचा समावेश असल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा -कोरोनाशी 'लढाई' : २६ क्रियाशील औषधी घटकांच्या निर्यातीवर निर्बंध
बनावट २३ कंपन्यांमधून खोटी बिले तयार करण्यात येत होती. प्रत्यक्षात या कंपन्यांकडून कोणत्याही वस्तुंचा पुरवठा केला जात नव्हता. तरीही इनपूट क्रेडिट टॅक्सची बिले मंजूर केली जात होती. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना २९ फेब्रुवारी अटक केली होती. त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी अनेक बनावट व्यवसाय दाखवून करचुकवेगिरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. बिले खरे वाटावीत यासाठी आरोपींनी बँकेचे व्यवहारही दाखविले होते.
हेही वाचा -अॅपल कंपनी स्मार्टफोन वापरणाऱ्याला देणार १,७५० रुपये, कारण...