महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

घरी बसून काम करा; नॅशनल स्टॉक एक्सचेंजची कर्मचाऱ्यांना सूचना - ट्रेडिंग मार्केट

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंगसह इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेअर बाजाराचे काम व्यवस्थित चालावे व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे गरजेचे असल्याचे एनएसईच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Corona Effect
कोरोना परिणाम

By

Published : Mar 18, 2020, 12:40 PM IST

मुंबई- कोरोनाचा प्रसार होत असल्याने अनेक कंपन्यांनी घरी बसून काम करण्याची कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनेही कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मंगळवारी सूचना केली आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंगसह इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेअर बाजाराचे काम व्यवस्थित चालावे व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे गरजेचे असल्याचे एनएसईच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाचे सावट : शेअर बाजारात चढ-उतार सुरू

राज्यात कोरोनाची ४२ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग होवू नये, यासाठी विविध कंपन्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details