महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फास्टॅगचे पैसे भीम यूपीआयमधूनही भरता येणार - Bhim UPI for toll plaza

भीम यूपीआय असलेल्या मोबाईल अ‌ॅपमधून वाहन चालकांना फास्टॅगचे रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना टोलनाक्यावरील रांगेत थांबावे लागणार नसल्याचे 'एनसीपीआय'ने म्हटले आहे.

Fastag
फास्टॅग

By

Published : Dec 26, 2019, 3:39 PM IST

नवी दिल्ली - टोलनाक्यावरून जाणाऱ्या वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. या फास्टॅगचे रिचार्ज करणे अधिक सुलभ होणार आहे. राष्ट्रीय देयक महामंडळ, भारत (एनपीसीआय) या सरकारी संस्थेने एनईटीसी फास्टॅगचे रिचार्ज भीम यूपीआयमधून करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.


भीम यूपीआय असलेल्या मोबाईल अ‌ॅपमधून वाहन चालकांना फास्टॅगचे रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना टोलनाक्यावरील रांगेत थांबावे लागणार नसल्याचे एनसीपीआयने म्हटले आहे.

हेही वाचा -घटलेल्या महसुलाने प्राप्तिकरात अतिरिक्त सवलती मिळण्याची शक्यता कमी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (एनईटीसी) हा टोलनाक्याचे पैसे रोकडविरहित पद्धतीने घेण्याचा उपक्रम आहे. केंद्र सरकारने वाहन चालकांना फास्टॅगचा वापर करणे १५ डिसेंबर २०१९ पासून बंधनकारक केले आहे. फास्टॅगच्या स्टिकरमुळे टोलनाक्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडून टोलचे पैसे स्वयंचलितपणे घेतले जातात. या सुविधेमुळे ग्राहकांना सुरक्षित आणि पारदर्शी अनुभव येईल, असा विश्वास असल्याचे एनपीसीआयचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविणा राय यांनी सांगितले.

हेही वाचा -काही दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला गती

ABOUT THE AUTHOR

...view details