मुंबई- ट्विटरवर अनेकदा वापरकर्त्यांमध्ये विविध विषयांवरून वाद-प्रतिवाद सुरू असतात. त्यावरून होणाऱ्या आक्षेपार्ह ट्विटबाबत ट्विटरने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आक्षेपार्ह अकाउंट स्वयंचलितपणे बंद करणे व त्यांना म्यूट करण्यासाठी नवीन टूल आणण्याचे कंपनी नियोजन करत आहे.
ट्विटरकडून वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच उपाययोजना करण्यात येतात. सतत आक्षेपार्ह ट्विट करणारे अकाउंट स्वयंचलितपणे डिलिट करण्यासाठी ट्विटर टूल आणणार आहे. आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या अकाउंटचा वापर करण्यासाठी सात दिवसापर्यंत मर्यादा घालून देण्यात येणार आहे.
'व्हर्च्युअल अॅनलिस्ट डे' या निमित्ताने कंपनीने स्लाईद्वारे सादरीकरण केले. यामध्ये नवीन सुरक्षेच्या टूलबाबत माहिती देण्यात आली आहे. जर ट्विटरवरील नियम तोडले तर अकाउंट हे ब्लॉक होमार आहेत. द्वेषमूलक टिप्पणी, अपमानजनक भाषा वापरणारे अकाउंट म्यूट केले जाणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.