अॅम्स्टरडॅम- ग्रामीण भागातील लोकांना उदरनिर्वाह मिळवून देणाऱ्या भारतीय स्टार्टअप नॉटऑनमॅपची ऑनलाईन पोर्टल बुकिंग डॉट कॉमने दखल घेतली आहे. या पोर्टलकडून नॉटऑनमॅपला २ लाख ५० हजार युरोची आर्थिक मदत मिळणार आहे.
'या' भारतीय स्टार्टअपला बुकिंग डॉट कॉमकडून मिळणार २ लाख ५० हजार युरोची मदत - startup
स्टार्टअपच्या मदतीने हिमाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड आणि कर्नाटकमधील ६० खेड्यांना भेट देता येते. तर २० समाजाच्या (community) लोकांसमवेत राहता येते.
बुकिंग डॉट कॉमने जगभरातील १० स्टार्टअपपैकी नॉटऑनमॅपची शुक्रवारी निवड केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नॉटऑनमॅपचे संस्थापक कुमार अनुभव म्हणाले, मी अभियंता आहे. काही वर्षे अमेरिकन कंपनीसाठी काम केले. मात्र आयुष्याचा उद्देश्य काय, असा प्रश्न मला सतत पडत होता. याच प्रश्नाने खूप मोठा बदल घडवून आणला आहे. प्रायोगिकतत्वावर २०१४ मध्ये नॉटऑनमॅप प्रकल्प सुरू केला होता. ग्रामीण भागाचे दर्शन घडवून आणणे हा खरा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. समाज संस्कृतीच्या वस्तुसंग्रहालयाप्रमाणे असतो. तसेच समाज हा आपला सांस्कृतिक वारसा असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
काय आहे नॉटऑनमॅपची संकल्पना-
स्टार्टअपमधून हिमाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड आणि कर्नाटकमधील ६० खेड्यांना भेट देता येते. यामध्ये २० समाजाच्या लोकांसमवेत राहता येते. ज्या प्रवाशांना नव्या ठिकाणी फिरण्याची आणि स्थानिक अनुभव घेण्याची आवड असते अशा व्यक्तींसाठी हे स्टार्टअप सेवा देते.