नवी दिल्ली-भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोलनाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनानुसार वाहनांना अत्यंत गर्दीच्या काळातही टोलनाक्यावर १० सेकंदाहून कमी वेळ लागणार आहे. त्यासाठी एनएचएआयने टोल नाक्यांसाठी सूचना दिल्या आहेत.
एनएचएआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार टोलनाक्यावर १०० मीटरहून अधिक वाहनांची गर्दी करता येणार नाही. फास्टॅगची १०० टक्के अंमलबजावणी होत असताना टोलनाक्यावर वाहनांना वाट पाहावी लागणार नसल्याचे एनएचएआयने म्हटले आहे. जर कोणत्या कारणाने १०० मीटरहून अधिक वाहनांची रांग असेल तर १०० मीटरहून कमी अंतर येईपर्यंत वाहनांकडून टोल आकारण्यात येणार नाही. त्या वाहनांना टोल न घेता जाण्याची परवानमी मिळणार आहे. या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी टोल प्लाझा ऑपरेटवर असणार आहे.
हेही वाचा-'ही' चारचाकी खरेदीनंतर पसंत नाही पडली, तर ३० दिवसानंतर पैसे परत!