नवी दिल्ली- एअर इंडियाने कर्मचाऱ्यांकरता ड्रेस कोड जाहीर केला आहे. नव्या नियमाप्रमाणे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना टी-शर्ट आणि जीन्स पँट घालून कार्यालयात येता येणार नाही. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात व्यवस्थित कपडे घालावे लागणार आहेत. या नियमाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर संकट येवू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू; टी-शर्टसह जीन्स घालण्यावर मनाई
कर्मचाऱ्यांनी कार्यालयात टी शर्टसह इतर कॅझ्युअल, पारदर्शी कपडे घालू नयेत. कंपनीचा प्रत्येक कर्मचारी हा ब्रँड अॅम्बेसडर आहे. कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीचा कंपनीच्या प्रतिमेवर परिणाम होतो, असे एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म आहेत, त्यांनी युनिफॉर्ममध्ये कार्यालयात यावे. जर कर्मचाऱ्याला युनिफॉर्म नसेल तर त्यांनी ड्रेसकोडच्या नियमांचे पालन करावे. हा नियम कायम असलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार, पुर्ण वेळ, अर्धवेळ व प्रशिक्षणार्थी अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. त्यांनी कामाच्या ठिकाणी व्यवस्थित कपडे घालावेत, असे एअर इंडियाने म्हटले आहे. महिला कर्मचाऱ्याने भारतीय व योग्य असा पाश्चिमात्य वेष परिधान करावा, असे पत्रात नमूद केले आहे.