नवी दिल्ली- डोमिनोझ पिझ्झाची भारतामध्ये मास्टर फ्रँचाईजी असलेल्या ज्युबिलियंट फुडवर्क्सने ग्राहकांचा आर्थिक डाटा लिक झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. डोमिनोझ पिझ्झाच्या ग्राहकांची आर्थिक माहिती डार्कवेबवर उपलब्ध असल्याचा दावा सायबर सिक्युरिटी फर्मने केला होता.
ज्युबिलियंट फुडवर्क्सच्या प्रवक्त्याने म्हटले, की कोणत्याही ग्राहकाची आर्थिक माहिती घेण्यात आलेली नाही. त्याचा कामकाजासह व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नाही. तज्ज्ञांकडून प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहितीही प्रवक्त्याने दिली आहे. योग्य ती पावले उचलण्यात आली आहे. आर्थिक डाटा लिक झाल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. आघाडीच्या सायबर सिक्युरिटी रिसर्चच्या माहितीनुसार डार्कवेबवर कोणताही आर्थिक डाटा नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या धोरणाप्रमाणे आम्ही क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणतीही आर्थिक माहितीचे जतन करत नाही. त्यामुळे ही माहिती जाहीर होऊ शकत नाही.
हेही वाचा-बजाज ऑटोची पल्सर एनएस १२५ लाँच, जाणून घ्या किंमत
काय आहे डाटा लिक होण्याचे प्रकरण-