महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बंद किंवा खासगीकरण...एअर इंडियापुढे दुसरा पर्याय नाही! - Union minister Hardeep Singh Puri

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंग म्हणाले की, निर्गुंतवणुकीसाठी सरकारला आणखी वेळ हवा आहे. येत्या काही दिवसांमध्ये वित्तीय निविदा आमंत्रित केल्या जाणार आहेत.

hardeep singh puri
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंग

By

Published : Mar 26, 2021, 7:34 PM IST

नवी दिल्ली -एअर इंडियाकरता खासगीकरण किंवा बंद असा पर्याय आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंग यांनी दिली. ते एका माध्यमाच्या कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंग म्हणाले की, निर्गुंतवणुकीसाठी सरकारला आणखी वेळ हवा आहे. येत्या काही दिवसांमध्ये वित्तीय निविदा आमंत्रित केल्या जाणार आहेत. निर्गुंतवणुकीपर्यंत एअर इंडिया सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही इच्छुक बोलीधारक पाहत आहोत. बोली निविदा खुली झाल्यानंतर ६४ दिवसांमध्ये वित्तीय बोली मिळणार आहेत. त्यानंतर निर्णय घेण्याबाबत आणि एअरलाईन सोपविण्याचा प्रश्न पाहिला जाणार आहे. केंद्र सरकारने एअर इंडियाचा संपूर्णपणे १०० टक्के हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एअर इंडियाचे इंडियन एअरलाईन्समध्ये २००७ मध्ये विलिनीकरण झाल्यापासून कंपनी तोट्यात आहे.

हेही वाचा-सोने १४७ रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरात १,०३६ रुपयांची वाढ

एअर इंडियाला रोज २० कोटी रुपयांचा तोटा

एअर इंडिया बंद करणे किंवा खासगीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. कारण, एअर इंडियाने पैसे मिळविले तरी रोज २० कोटींचा तोटा होत आहे. चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापन केल्याने एअर इंडियावर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. पुढे हरदीप सिंग म्हणाले की, निर्मलाजी (केंद्रीय अर्थमंत्री) मला काही पैसे द्या, अशी म्हणण्याची माझी क्षमता नाही.

हेही वाचा-सायरस मिस्त्रींबरोबरील वादात 'सर्वोच्च' विजय; रतन टाटांनी ही' दिली प्रतिक्रिया

सुत्राच्या माहितीनुसार सरकारने टाटा ग्रुप आणि स्पाईसजेटची नावे छाननीमध्ये निवडण्यात आली आहेत. या कंपन्यांना सरकारकडून प्रस्तावाची विनंती (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details