नवी दिल्ली -सरकारी तेल कंपन्यांनी सलग १६ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३.७१ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७३.८७ रुपये आहेत. देशभरातील विविध शहरातही पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत.
कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याचे वृत्त येतात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर बाजारात पेट्रोल व डिझेलची मागणी वाढेल, अशी कंपन्यांना अपेक्षा होती. मात्र, नवीन कोरोनाचा विषाणू प्रकार सापडल्याने जगभरातील बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. पुन्हा काही देशांत टाळेबंदी होण्याची भीती आहे. या भीतीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ५० डॉलरहून कमी राहिला आहे.