वॉशिंग्टन -अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्ध शमण्याची चिन्हे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. चीनमधील उत्पादित मालावरील कर मागे घेण्यावर आपण सहमत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलत होते.
गेल्या महिन्यात अमेरिका-चीनने अंशत: झालेल्या कराराची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून दोन्ही देश अतिरिक्त आयात शुल्क काढून टाकण्यावर सहमत झाल्याचा दावा चीनने केला होता. दोन्ही देशामधील व्यापारी युद्ध शमणार असल्याने जगभरातील शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुधारणा झाली होती.
व्यापारी वादाने अमेरिकेतील कंपन्या आणि ग्राहकांना फायदा झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ते म्हणाले, आयात शुल्क मागणे घेण्याची त्यांची (चीन) इच्छा आहे. मला ते मान्य नाही, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा-'आर्थिक सुधारणा लागू केल्याने अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी येईल'