महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देशाला मिळणारी तिसरी कोरोना लस; स्पूटनिक देशातील बाजारपेठेत पुढील आठवड्यात होणार दाखल - नीती आयोग सदस्य व्ही के पॉल

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा फॉर्म्यूला इतर लस उत्पादकांना शेअर करण्याची तयारी दर्शविली आहे. स्पूटनिक लस भारतीय बाजारपेठेत पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.

स्पूटनिक
स्पूटनिक

By

Published : May 13, 2021, 7:36 PM IST

नवी दिल्ली -देशभरातील जनतेला कोरोना लशींची प्रतिक्षा असताना दिलासादायक बातमी आहे. रशियाची स्पूटनिक ही कोरोना लस पुढील आठवड्यापासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, की स्पूटनिक लस भारतामध्ये आली आहे. ही लस भारतीय बाजारपेठेत पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा फॉर्म्यूला इतर लस उत्पादकांना शेअर करण्याची तयारी दर्शविली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशात कोरोनाचे नवीन ३,६२,७२७ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ४,१२० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

स्पूटनिक देशातील बाजारपेठेत पुढील आठवड्यात होणार दाखल

हेही वाचा-कोरोनावरील 'स्पूटनिक व्ही' लस फायझरसह मॉर्डनहून स्वस्त; रशियाचा दावा

स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे

  • डॉ. रेड्डीजने सप्टेंबर २०२० मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे.
  • स्पूटनकि व्ही ही लस विकसित करणाऱ्या गॅमेलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमिलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजीला भारतात 125 दशलक्ष लशीचे डोस देण्याची परवानगी मिळालेली आहे.
  • यापूर्वीच आरडीआयएफचे सीईओ किरील दमित्रिएव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत भारतामध्ये 50 दशलक्ष डोसचे उन्हाळ्यात उत्पादन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आरडीआयएफने भारतामधील पाच औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत.
  • स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
  • कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी फायझर, स्पूटनिक व्ही आणि मॉर्डना लसीचे प्रत्येकी दोन डोस घ्यावे लागतात. तर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे दोन डोस घ्यावे लागतात.

हेही वाचा-'स्पूटनिक व्ही' मार्चमध्ये लाँच करण्याचा डॉ. रेड्डीजचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details