नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज संसदेत अर्थसंकल्प २०२२-२३ सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये झिरो बजेट शेतीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच कृषी क्षेत्रात ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर वाढवून त्याच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतीविषयक माहिती मोठ्या प्रमाणात मिळावी आणि मदत व्हावी यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.
Union Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 'या' घोषणा करण्यात आल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प होता. गतवर्षीप्रमाणे यंदाही पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Agriculture Budget
कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या घोषणा-
- शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या रक्षणासाठी ड्रोनच्या वापरास परवानगी देणार
- शेती विषयावरील अभ्यासक्रम वाढवणार
- शेतकऱ्यांना डिजिटल सुविधांसाठी पीपीपी योजना
- फळ उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील घोषणा
- ऑर्गेनिक शेतीवर भर देण्यात येणार
- असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
- गव्हासह रबी पीकांची खरेदी वाढवणार
- शेतीविषयक महाविद्यालय उभारण्यावर भर देण्यात येणार
- कृषी क्षेत्रात ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर वाढवून त्याच्या वापरासाठी परवानगी
- शेतीविषयक महाविद्यालय उभारण्यावर भर देणार
हेही वाचा:Budget Agriculture Sector :शेतकऱ्यांना एमएसपीची भेट
Last Updated : Feb 1, 2022, 1:16 PM IST