महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एनआयआरडीपीआर ग्रामीण नवसंशोधकांची स्पटेंबरमध्ये घेणार परिषद - आंत्रेप्रेन्युअर

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ नवसंशोधन ग्रामीण नवसंशोधक स्टार्टअप परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.  आंत्रेप्रेन्युअर यांना आर्थिक मदत आणि जाळे विस्तारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Aug 3, 2019, 7:06 PM IST

हैदराबाद - केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही नवसंशोधक आणि स्टार्टअप कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी तिसऱ्या ग्रामीण नवसंशोधक स्टार्टअप परिषदेचे (आरआयएससी) आयोजन राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज (एनआयआरडीपीआर) संस्था करणार आहे. ही दोन दिवसीय परिषद ही विविध आंत्रेप्रेन्युअर, ग्रामीण नवसंशोधक आणि महत्त्वाकांक्षी स्टार्टअपसाठी मोठे माध्यम असणार आहे. यामध्ये त्यांना कल्पना व तंत्रज्ञान दाखविण्याची संधी मिळणार आहे.

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ नवसंशोधन ग्रामीण नवसंशोधक स्टार्टअप परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. आंत्रेप्रेन्युअर तसेच नवसंशोधकांना आर्थिक मदत आणि जाळे विस्तारण्यासाठी (नेटवर्क सपोर्ट) सहकार्य करण्यात येणार आहे.

परिषदेमध्ये हे असणार मुख्य विषय-

शेती, शेतीशी निगडित जोडधंदे, हरित उर्जा पर्याय, कचऱ्यातून संपत्ती, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी हे परिषदेत मुख्य विषय असणार आहेत. त्याचबरोबर
पाणी आणि स्वच्छता, शाश्वत घरांचे बांधकाम, शाश्वत उपजीविका या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.

हे देण्यात येणार बक्षीस-
उत्कृष्ट स्टार्टअपला १ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर नवसंशोधकांना ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय कार्यशाळा करण्यासाठी एका वर्षाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. या कार्यशाळा एनआयआरडीपीआरकडून संरचना, पॅकेजिंग, विपणनवर घेण्यात येतात.

एनआयआरडीपीआरचे संचालक डब्ल्यू.आर.रेड्डी म्हणाले, ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर केल्यास स्थलांतरणासारख्या समस्या सोडविणे शक्य आहे. ग्रामीण भागातील नवसंशोधकांना अत्यंत महत्त्वाचे सहकार्य करणे हा आरआयएससी कार्यक्रमाचा उद्देश्य आहे. कारण, ग्रामीण भागातील आव्हानांवर मात करण्याची त्यांना सर्वात अधिक माहिती असते.

ABOUT THE AUTHOR

...view details