मुंबई - नीरव मोदीला 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्यासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला नीरव मोदीच्या वकिलाने विशेष न्यायालयात विरोध केला आहे. पंजाब नॅशनल बँकेची २ अब्ज डॉलरची फसवणूक केलेला नीरव मोदी लंडनमध्ये पळून गेला आहे.
'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्याच्या ईडीच्या याचिकेला नीरव मोदीचा विरोध - मेहुल चोक्सी
ईडीकडून मालमत्ता ताब्यात घेण्यात येताना एफईओच्या नियमांचे पालन होत नाही, असा नीरव मोदीने स्वतंत्र याचिकेतून न्यायालयात आक्षेप घेतला आहे.
ईडीने जुलै २०१८ मध्ये नीरव मोदीविरोधात नव्याने अस्तित्वात आलेल्या फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
ई़डीकडे मनी लाँड्रिंगच्या कायद्यानुसार असलेले पुरावे व जवाब आहेत. या पुरावे व जवाबाच्या आधारे एफईओ कायद्याची अंमलबजावणी करण्याला परवानगी नसल्याचे मोदीच्या वकिलाने न्यायालयात म्हटले. सेच ईडीकडून मालमत्ता ताब्यात घेण्यात येताना एफईओच्या नियमांचे पालन होत नसल्याचाही स्वतंत्र याचिकेतून न्यायालयात आक्षेप घेण्यात आला. याच प्रकारचे आक्षेप मोदीचा मामा मेहुल चोक्सीनेही घेतले होते.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज या कागदपत्रांचा गैरवापर करून पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केली. यामध्ये बँकेचे सुमारे २ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. विदेशात पळून गेलेल्या मोदी आणि चोक्सी या दोन्ही आरोपींच्या प्रत्यापर्णाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.