नवी दिल्ली- संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने संरक्षण सेवेअंतर्गत २०२०-२१साठी ९० हजार ४८ कोटी रुपयांचा तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद वाढविण्यात आली आहे.
राज्यसभेचे खासदार पी. भट्टाचार्य व विजयपाल सिंह तोमर यांनी विचारलेल्या प्रश्नाला श्रीपाद नाईक यांनी लेखी उत्तर दिले आहे. संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणात नवी शस्त्रास्त्रांची खरेदी आणि सध्या असलेल्या शस्त्रास्त्रांचे आणि यंत्रणेच्या अद्ययावतीकरणाचा समावेश आहे. यासाठी एकूण तरतुदीच्या २७.८७ टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
हेही वाचा-दिलासादायक वृत्त.. 'ही' कंपनी देणार ३० हजार हंगामी नोकऱ्या