नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महामार्गांवरील टोल वसूली २० एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मोटार वाहतूक संघटनेने विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंच्या मालवाहू वाहनांनाही परवानगी देण्याचा निर्णय नुकतेच घेतला आहे.
केंद्र सरकारने २५ मार्चपासून महामार्गांवरून घेण्यात येणारी टोल वसूली तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागे कोरोनाच्या संकटात आपत्कालीन वाहतूकीत अडथळा येवू नये, हा उद्देश होता.
हेही वाचा-शेअर बाजार गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.८३ लाख कोटींची वाढ, 'हे' आहे कारण
केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्रक आणि इतर मालवाहू वाहनांना वाहतूक करण्याची २० मार्चपासून परवानगी दिली आहे. या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योग्य कार्यवाही करावी, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने टोल वसूली करण्याचा निर्णय घेतला आहे. तोटाही सहन करावा लागत असल्याचा संघटनेने दावा केला आहे.
हेही वाचा-डॉलरच्या तुलनेत रुपया ४८ पैशांनी वधारला; आरबीआयच्या आर्थिक सुधारणेच्या घोषणांचा परिणाम