महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

‘ग्राहकाला राजा’ करणारा नवा कायदा आजपासून अंमलात - Food and Public Distribution on consumer protection

ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या जागी ग्राहक संरक्षण कायदा 2019 अस्तित्वात येणार आहे. या कायद्याला राष्ट्रपतींनी ऑगस्ट २०१९ मध्ये मंजुरी दिली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनाही नव्या कायद्याच्या कार्यक्षेत्रात विस्ताराने आणण्यात आले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 20, 2020, 7:11 PM IST

नवी दिल्ली– ग्राहकाला खऱ्या अर्थाने राजा म्हणजे ग्राहकाला सर्व न्याय्य हक्क देणारा कायदा अस्तित्वात आला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 हा 20 जुलैपासून अस्तित्वात असल्याची अधिसूचना काढली आहे.

ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या जागी ग्राहक संरक्षण कायदा 2019 अस्तित्वात येणार आहे. या कायद्याला राष्ट्रपतींनी ऑगस्टला मंजुरी दिली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनाही नव्या कायद्याच्या कार्यक्षेत्रात विस्ताराने आणण्यात आले आहे. नव्या कायद्यामागे ग्राहकांचे हितसंरक्षण करणे आणि त्यांच्या अधिकारांना आणखी बळ देणे, हा हेतू आहे. उत्पादन हे सदोष आढळले तर कंपन्यांना मोठे दंड व कठोर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे. तर खोटी जाहिरात केल्यासही कंपन्यांही मोठा दंड ठोठावण्याची नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद आहे.

कायद्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) स्थापन करण्याची तरतूद आहे. ग्राहक न्यायालयात सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्याप्रमाणे ग्राहक संरक्षण मंचाकडे न्याय मिळण्यास वेळ लागतो.ग्राहकांना उत्पादन आणि सेवाविरोधात ऑनलाईन तक्रार करता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details