हैदराबाद- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केले आहे. प्रत्यक्षात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शक्य असल्याचा दावा एनआयआरडीपीआर संस्थेने केला आहे. त्यासाठी 'राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि पंचायती राज'ने मत्स्यशेतीसाठी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
एनआयआरडीपीआरमध्ये कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मदतीने बॅकयार्ड रि-सर्क्युलेटरी मत्स्यशेतीची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यामध्ये जलाशयातील कमी पाण्यात जास्तीत जास्त मत्स्यशेती करणे शक्य होते. जास्त घनतेने म्हणजे अधिक प्रमाणात मासे ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थापन करणे सहजशक्य होते.
शेतीच्या पद्धतीत सुधारणा केल्यासच शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होवू शकते, असे एनआयआरडीपीआरचे संचालक डब्ल्यू.आर.रेड्डी यांनी म्हटले. तंत्रज्ञान असलेल्या शेतीमधील उपायामधून तरुणांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, असा रेड्डी यांनी विश्वास व्यक्त केला. ग्रामीण तंत्रज्ञान वसाहतमध्ये (रुरल टेक्नॉलॉजी पार्क) मत्स्यशेतीच्या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय मत्स्योद्योग विकास मंडळ या सरकारी संस्थेने अर्थसहाय्य केले आहे.