सॅनफ्रान्सिस्को- नेटफ्लिक्सच्या सशुल्क सदस्यांची संख्या २०० दशलक्षहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या काळात स्ट्रिमिंग आणि मनोरजंनाची मागणी वाढल्याने नेटफ्लिक्सच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
नेटफ्लिक्सने चौथ्या तिमाहीमधील कामगिरीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार सशुल्क सदस्यांची संख्या ८.५ दशलक्षने वाढली आहे. तर सशुल्क स्ट्रीमिंग सदस्यांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. तर सरासरी प्रेक्षकांची संख्या तेवढीच राहिली आहे. २०१८ पासून सदस्यांची संख्या १११ दशलक्षांवरून २०४ दशलक्ष झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात दरवर्षी ४ ते ५ अब्ज डॉलरने महसुलात वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सला चौथ्या तिमाहीत ६.६४ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळाले आहे.