नवी दिल्ली -व्हिडीओ स्ट्रिमींगमध्ये आघाडीवर असलेल्या नेटफ्लिक्सने टिकटॉकशी स्पर्धा करणारे अॅप काढले आहे. फास्ट लाफ्स असे या अॅपचे नाव आहे. अॅपमध्ये विनोदी संवादाच्या लघू व्हिडिओ क्लिप्स या फुल स्क्रीनमध्ये दिसू शकणार आहेत.
फास्ट लाफ्स हे केवळ आयओएस डिव्हाईसवर आणि निवडक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. हे अॅप टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्ससारखे आहे. फास्ट लाफ्समध्ये बिग माउथ आणि स्टँड-अपमधील व्हिडिओच्या क्लिप आहेत. आवडीचे कलाकार, शो, चित्रपट यांचे व्हिडिओ क्लिप्स जतन करून पुन्हा पाहता येणे शक्य आहे.
हेही वाचा-रिलायन्सकडून सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफत लस