मुंबई - डिजीटल बँकिंगवरील लोकांचा विश्वास टिकविणे गरजेचे आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेवर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. त्यासाठी बँकांनी डिजीटल तंत्रज्ञानात अधिक गुंतवणूक करावी, असेही दास म्हणाले. ते रेपो दर जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड लाँच करणे व नवीन डिजीटल सेवा सुरू करण्यावर निर्बंध लागू केले आहेत. कारण, त्यामधील सेवांमध्ये त्रुटी वारंवार दिसून आल्या होत्या. त्याबाबत बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की एचडीएफसीचे डिजीटल देयक व्यवहारात मोठे स्थान आहे. त्यांच्या सेवांमधील त्रुटीबाबत आम्हाला चिंता आहे. एचडीएफसी बँकेने त्यांची आयटी व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे.
हेही वाचा-पुन्हा रेपो रेट जैसे थे! विकासदर उणे ७.५ होण्याची शक्यता..