मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडून 1 हजार 200 कोटींचे कर्ज थकित वसूल करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणात (एनसीएलटी) याचिका दाखल केली आहे. ही याचिका एनसीएलटीने आदेशासाठी राखीव ठेवली आहे.
स्टेट बँक इंडियाने थकलेले कर्ज वसूल करण्यासाठी नादारी आणि दिवाळखोरी कायद्यांतर्गत एनसीएलटीमध्ये याचिका दाखल केली आहे. अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेश्न्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी वैयक्तिक कर्जाची हमी दिली होती. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.