नवी दिल्ली - बँक कर्मचारी संघटनांची शिखर संघटना युएफबीयुने पुकारलेल्या संपाने बँकांच्या सेवा विस्कळित झाल्या आहेत. यामध्ये धनादेश वटण्यासह इतर सेवांचा समावेश आहे. देशभरात आज व उद्या बँक कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध करत संप पुकारला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (युएफबीयु) संपात १० लाख बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्याचा दावा करण्यात आहे. विविध वृत्तानुसार देशामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक बँकांसह खासगी बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाचे (एआयबीओसी) संयुक्त महासचिव संजोय दास म्हणाले की, संपाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या संपाला नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ऑफिसर्स असोसिएशन, शेतकरी, सीटू आणि एआयटीयूसीने पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा-१ एप्रिल २०२२ नंतर १५ वर्षे जुनी सरकारी वाहने भंगारात निघणार
- बहुतांश बँकांच्या शाखा संपामुळे बंद आहेत. रुग्णालये, रेल्वे स्थानक आणि विमानतळानजीक असलेले वगळता सर्व एटीएम बंद आहेत.
- पश्चिम बंगालमध्ये अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्राच्या कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला आहे.
- महाराष्ट्रात सार्वजनिक बँकांनी ग्राहकांना इंटरनेट, मोबाईल बँकिंग अशा डिजीटल चॅनेलाचा वापर करण्याची सूचना केला आहे. महाराष्ट्रातील ४० हजार बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपात सहभाग घेतल्याचा दावा संघटनेने केला आहे. हे कर्मचारी व अधिकारी १० हजार बँकांच्या शाखांमध्ये कार्यरत आहेत.
- पंजाब आणि हरियाणामधील बँक कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली आहेत. सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याने ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत.