नवी दिल्ली - केंद्र सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (एनआयएफएम) फरिदाबाद संस्थेचे नाव बदलण्यात येणार आहे. या संस्थेचे नाव अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (एजेएनआयएफएम) असे नाव असणार आहे.
एनआयएफएम, फरिदाबाद ही १९९३ मध्ये अर्थमंत्रालयाच्या वित्तव्यय विभागांतर्गत स्थापन झाली आहे. या संस्थेमधून वित्त खात्यामधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. एनआयएफएम सोसायटीचे अध्यक्षपद हे केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे असते.
केंद्र सरकारच्या वरिष्ठ आणि मध्यम पातळीवरील व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसाठी माहिती केंद्र झाले आहे. यामध्ये वित्तीय व्यवस्थापन, सार्वजनिक खरेदी आणि सार्वजनिक धोरण यावर प्रशिक्षण देण्यात येते.