महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नरेश गोयलांची न्यायालयात धाव ; विदेश प्रवासावरील बंदी उठविण्याची केली विनंती - Delhi High court

कंपनी व्यवहार मंत्रालयाला जेट एअरवेजमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यानंतर सरकारने गोयल यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युअलर काढले आहे.

नरेश गोयल

By

Published : Jul 8, 2019, 3:51 PM IST

नवी दिल्ली - जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या प्रवासावरील बंदी उठवावी, अशी विनंती दिल्ली उच्च न्यायालयाला केली आहे. या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय शुक्रवारी सुनावणी घेणार आहे. गोयल यांच्या विनंतीला सरकार जोरदार विरोध करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कंपनी व्यवहार मंत्रालयाला जेट एअरवेजमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यानंतर सरकारने गोयल यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युअलर काढले आहे. विदेशात प्रवास करण्याच्या न्यायालयातील याचिकेला सरकार जोरदार विरोध करणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे. जनहितासाठी सरकार ही भूमिका घेणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांना पगारी देण्यात आल्या नाहीत. तर कंपनीच्या सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत. गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल हे २५ मे रोजी देश सोडून जात असताना पासपोर्ट अधिकाऱ्यांनी त्यांना मुंबई विमानतळावर रोखले होते. गोयल दाम्पत्य हे दुबईमार्गे लंडनला जाणार होते.

काय आहे लूक आऊट सर्क्युलअर-
एखाद्या व्यक्तीला सागरी अथा विमान मार्गातून विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी लूक आऊट सर्क्युलअर काढले जाते. त्यासंदर्भात पासपोर्ट अधिकाऱ्यांना सूचित केले जाते. यापूर्वी नीरव मोदी विरोधात लूक आऊट सर्क्युअलर काढण्यात न आल्याने तो लंडनला पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याने पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटींची फसवणूक केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकार सध्या निकराचे प्रयत्न करत आहे.

यापूर्वीच नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांनी जेट एअरवेजच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जेट एअरवेज सध्या नादारी प्रक्रियेतून जात आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने आदेश दिल्यानंतर जेट एअरवेजचा गंभीर फसवणूक तपास कार्यालयाकडून (एसएफआयओ) सखोल तपास केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details