नवी दिल्ली -इंग्लंडच्या इतिहासात प्रथमच जास्तीत जास्त अब्जाधीश होत आहेत. यामध्ये मुंबईमध्ये जन्म जालेल्या डेव्हिड आणि सिमन रियूबेन या बंधुंचा समावेश आहे. या रियूबेन बंधुंनी इंग्लंडमध्ये सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत दुसरा क्रमांक मिळविला आहे. या बंधुंची संपत्ती २१.५ अब्ज पाऊंड आहे.
इंग्लंडमधील माध्यमाच्या माहितीनुसार चालू वर्षात इंग्लंडमध्ये १७१ अब्जाधीश आहेत. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत २४ हून अधिक आहे. इंग्लंडमध्ये सर्वात गेल्या ३३ वर्षात यंदा अब्जाधीशांचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. सर्व अब्जाधीशांच्या संपत्तीत २२ टक्के वाढ होऊन एकत्रित संपत्ती ही ५९७.२६९ पौंड आहे.
हेही वाचा-स्पूटनिक लशीचे ऑगस्टमध्ये भारतात सुरू होणार उत्पादन
मूळ युक्रेनमधील सर लेन ब्लाव्हटनिक हे इंग्लंडमधी सर्वात श्रीमंत व्यक्ती
यंदा सर लेन ब्लाव्हटनिक हे इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत ठरले आहे. ब्लाव्हटनिक हे मूळ युक्रेनमधील आहेत. उर्जा आणि अॅल्युमिनियम ग्रुप यामधून सर लेन ब्लाव्हटनिक यांनी सपत्ती मिळविली आहे. यापूर्वी त्यांनी २०१५ मध्ये श्रीमंताच्या यादीत पहिला क्रमांक मिळविला होता.
हेही वाचा-केंद्राकडून साखरेच्या निर्यातीवरील अनुदानात प्रति टन २ हजारांची कपात
इंग्लंडमध्ये मूळ भारतीय असलेल्या तीन बंधुंचा दबदबा
- मुंबईमध्ये जन्मलेले डेव्हिड आणि सिमन रियूबेन हे यांचा श्रीमंताच्या यादीत दुसरा क्रमांक आहे.
- स्टील उद्योगातील सम्राट मानले जाणारे लक्ष्मी मित्तल यांचा यादीत १९ वा क्रमांक आहे.
- गतवर्षी त्यांचा यादीत ५ वा क्रमांक होता. श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबाचा श्रीमंताच्या यादीत २०१९ मध्ये पहिला तर २०२० मध्ये दुसरा क्रमांक राहिला.
- यंदा हिंदुजा बंधुंचा तिसरा क्रमांक राहिला आहे. या कुटुंबाच्या संपत्ती १ अब्ज पाऊंडने वाढ होऊन १७ अब्ज पाऊंडची संपत्ती झाली आहे.