नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीज ही आयआयएफएल वेल्थ हरुण इंडियाच्या यादीत सर्वाधिक मूल्य असलेली भारतीय कंपनी ठरली आहे. सलग नवव्या वर्षात सर्वाधिक मूल्य असल्याचा अव्वल क्रमांक मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्सने टिकविला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण ६.५८ लाख कोटी रुपये संपत्ती आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती ही गेल्या १२ महिन्यांत ७३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी ही आशियातील प्रथम तर जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 'हरुण भारतीय सर्वाधिक श्रीमंत यादी २०२०'मध्ये १ हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले ८२८हून अधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.
लंडनस्थित हिंदुजा ब्रदर्स यांची एकत्रित संपत्ती ही १.४३ लाख कोटी रुपये आहे. हे देशातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नडार यांची संपत्ती १.४१ लाख कोटी रुपये आहे. त्यांचा यादीत तिसरा क्रमांक आहे. त्यानंतर गौतम अदाना आणि कुटुंबाचा चौथा क्रमाक आहे. अझीम प्रेमजी यांचा पाचवा तर अॅव्हेन्यू सुपरमार्टचे संस्थापक राधाकृष्णन दमानी यांचा सहावा क्रमांक आहे.
हेही वाचा-सणासुदीच्या मुहूर्तावर एसबीआय ग्राहकांना देणार किरकोळ कर्जावर ऑफर