नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 2 जी सेवेच्या धोरणात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. 2 जी सेवा ही 25 वर्षांपूर्वी झाली होती. या सेवेला इतिहासजमा करा, असे अंबानी यांनी म्हटले आहे.
‘2 जी सेवा दूर करण्यासाठी धोरणात तातडीने सुधारणा करा’
2जी युगातील फीचर फोन हे 30 कोटी ग्राहकांना इंटरनेटच्या मुलभूत सेवांपासून दूर ठेवतात. दुसरीकडे भारत आणि इतर देश हे 5 जीच्या युगात प्रवेश करत असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
देशात 25 वर्षांपूर्वी मोबाईलचे उत्पादन झाले होते. या घटनेला 25 वर्षे पूर्ण झाली असताना मुकेश अंबानी म्हणाले, 2जी युगातील फीचर फोन हे 30 कोटी ग्राहकांना इंटरनेटच्या मूलभूत सेवांपासून दूर ठेवतात. दुसरीकडे भारत आणि इतर देश हे 5 जीच्या युगात प्रवेश करत आहेत. देशातील 300 दशलक्ष ग्राहक हे अजून 2जी युगात अडकले आहेत. या वस्तूस्थितीकडे मी विशेष लक्ष वेधू इच्छितो. त्यांचे फीचर फोन हे इंटरनेटचा मूलभूत वापर करण्यापासून त्यांना परावृत्त करतात. भारत आणि उर्वरित जग हे 5 जी टेलिफोनच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे तातडीने धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे.
देश 2 जीपासून मुक्त होण्यासाठी रिलायन्सच्या मालकीची जिओ परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन तयार करणार असल्याचे नुकतेच मुकेश अंबानी यांनी म्हटले होते.