महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

लालपरीला नवसंजीवनी: टाळेबंदीतही मिळविले 21 लाखांचे उत्पन्न - एसटी महामंडळ न्यूज

विश्वासार्हता आणि सुरक्षितता या दोन प्रमुख गोष्टींमुळे राज्यभरातून एसटीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एसटी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे.

State transport
बसद्वारे मालवाहतूक

By

Published : Jun 12, 2020, 2:50 PM IST

मुंबई- टाळेबंदीमुळे जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली 'लालपरी' आर्थिक संकटात सापडली आहे. त्यावर मात करण्यासाठी एसटी मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेताना दिसत आहे. त्यातून एसटी परिवहन महामंडळाला 21 लाखांचे उत्पन्नदेखील मिळाले आहे.

विश्वासार्हता आणि सुरक्षितता या दोन प्रमुख गोष्टींमुळे राज्यभरातून एसटीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एसटी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे.


मालवाहतूक एसटीने 21 मेपासून 543 फेऱ्यांच्या माध्यमातून 3 हजार टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपऱ्यात केली आहे. त्यासाठी 90 हजार किमीचा प्रवास या वाहनांनी केला आहे.
राज्यात प्रत्येक विभागात दहाप्रमाणे 330 बसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. राज्यात 72 बस मालवाहतूकीसाठी तयार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून 300 मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रुपांतरीत) कार्यरत आहेत. म्हणजेच आजघडीला 372 बस मालवाहतूकीसाठी उपलब्ध आहेत.

ही वाहने मालवाहतुकीसाठी उपलब्ध होणार
एसटी महामंडळ आपल्या बसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते. त्यासाठी आवश्यकतेनुसार जुन्या एसटी बसमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत करण्यात येत आहे.

ज्या प्रवासी वाहनांचे विहित आयुर्मान (6.5 लाख किमी आणि 10 वर्षे पूर्ण झालेल्या) पूर्ण झाले आहे, अशा प्रवासी वाहनांच्या अंतर्गत रचनेत बदल करून ही वाहने मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

राज्य सरकारच्या 18 मे रोजीच्या मान्यतेनंतर मालवाहतूक बसचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य, बी-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाईप, रंगाचे डबे व अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एसटीमधून केली जात आहे.
मालवाहतुकीच्या मालवाहतुकीच्या व्यवसायासाठी एसटीचे प्रयत्न
सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत एमआयडीसी.,कारखानदार, लघुउद्योजक, कृषिजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांना एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये अनेक महामंडळे व व्यापारी आपला माल एसटीच्या मालवाहतुक सेवेतून पाठविण्यास उत्सुक आहेत.

पुणे, नाशिक, सातारा, सांगली,जळगांव, गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असा परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details