महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करा; महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज फेडरेशनची राज्यपालांकडे मागणी

शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज फेडरेशनने राज्यपाल बी. एस. कोश्यारी यांना लिहिले आहे.

संपादित - शेतीचे नुकसान

By

Published : Nov 15, 2019, 7:19 PM IST

मुंबई- अवकाळी पावसाने पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे पीककर्जाची पुनर्रचना करावी व शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज फेडरेशनने राज्यपालांकडे केली.

शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज फेडरेशनने राज्यपाल बी. एस. कोश्यारी यांना लिहिले आहे.

काय म्हटले आहे पत्रात ?

अपुऱ्या पावसाने गेली तीन वर्षे राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी संकटाचा सामना करत आहे. मागील सरकारने जाहीर केलेली मदत मिळावी, याची शेतकरी अजूनही वाट पाहत आहेत. यातच शेतकरी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने अडचणीत सापडला आहे. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, असे एमएसबीईएफने म्हटले आहे. त्यातून ही बँक खाती अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) होण्यापासून टाळावे, असेही संघटनेने पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा-भारत-अमेरिकेमधील व्यापारी समस्या सुटल्या; पहिल्या व्यापारी पॅकेजचा मार्ग मोकळा

अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यक्तींकडून (सावकार) कर्ज घेतले आहेत. जास्तीच्या व्याजदराने शेतकरी कर्जाचा सापळ्यात अडकले आहेत. अतिवृष्टी आणि संपूर्ण पीक वाया गेल्याने त्यांची स्थिती आणखी बिकट होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्यांनी नवे कर्ज तातडीने मंजूर करावे, असेही संघटनेने पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज फेडरेशन ही संघटना ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनशी निगडीत आहे.

हेही वाचा-इंटरकनेक्ट युझेज चार्जेस रद्द करण्याची जिओकडून पुन्हा मागणी; भारती एअरटेलचा विरोध

ABOUT THE AUTHOR

...view details