महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

५जीच्या दहापट ६जीचे वेगवान इंटरनेट; 'या' देशात सुरू करण्याचे प्रयत्न - Goldman Sachs

अमेरिकास्थित बँकिंग गुंतवणूक आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी गोल्डमॅन सॅशच्या अंदाजानुसार २०२० मध्ये जगभरात २० कोटी ५ जी स्मार्टफोनचे वितरण होणार आहे.  हा अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत २० पट अधिक आहे.

६ जी तंत्रज्ञान
6 G

By

Published : Jan 21, 2020, 7:18 PM IST

टोकियो - जपानमध्ये ५-जीनंतरच्या तंत्रज्ञानाचा म्हणजे ६-जी तंत्रज्ञानाचा २०३० पर्यंत वापर सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान सध्याच्या ५-जीहून दहापट अधिक वेगवान असल्याचे मानण्यात येत आहे.


जपानचे केंद्रीय गृहमंत्री आणि संवाद मंत्रालयाकडून जानेवारीत सरकारी-नागरी संशोधन सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. या सोसायटीचे अध्यक्षपद टोकिया विद्यापीठ, गोशीनजीनकडे असणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री टाकाओ सेने यांच्याकडे देखरेखीचे काम असणार असल्याचे जपानच्या माध्यमाने म्हटले आहे.

हेही वाचा-आर्थिक कसरत : केंद्र सरकार आरबीआयकडून 'एवढे' कोटी रुपये घेण्याची शक्यता

जपानच्या सरकारकडून ६ जी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अमेरिकास्थित बँकिंग गुंतवणूक आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी गोल्डमॅन सॅशच्या अंदाजानुसार २०२० मध्ये जगभरात २० कोटी ५ जी स्मार्टफोनचे वितरण होणार आहे. हा अंदाज गेल्यावर्षीच्या तुलनेत २० पट अधिक आहे. चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीचे संस्थापक ली जून यांनी ५जी, कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये पुढील पाच वर्षात ७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा-झोमॅटोची उबेर इट्सवर मात; खरेदी केला भारतामधील संपूर्ण हिस्सा

ABOUT THE AUTHOR

...view details