नवी दिल्ली- २०१८ मध्ये रोज सरासरी ३५ बेरोजगार आणि स्वयंरोजगार असलेल्या ३६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) अहवालात दिली आहे.
२०१८ मध्ये १२ हजार ९३६ बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. तर १३ हजार १४९ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. तर कृषी क्षेत्रातील १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१८ मध्ये एकूण १ लाख ३४ हजार ५१६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत वर्ष २०१८ मध्ये आत्महत्येचे प्रमाण हे ३.६ टक्क्यांनी वाढले आहेत.