नवी दिल्ली - येस बँकेच्या ग्राहकांकरता दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक येस बँकेवरील तात्पुरते निर्बंध (मोरॅटरियम) १८ मार्चला काढणार आहे. तर आरबीआयने नियुक्त केलेले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नवे संचालक मंडळ महिनाखेर अस्तित्वात येणार असल्याचे सरकारने अधिसुचनेत म्हटले आहे.
केंद्र सरकारने येस बँकेच्या फेररचना आराखड्याच्या योजनेला शुक्रवारी मंजुरी दिली. या आराखड्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेत किमान ४९ टक्के हिस्सा विकत घेवू शकणार आहे. तर किमान तीन वर्षापर्यंत स्टेट बँकेला येस बँकेमधील २६ टक्के हिस्सा विकता येणार नाही.
हेही वाचा-महागाईचा दणका: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात ३ रुपयांनी वाढ