नवी दिल्ली - चातकासारखे अनेकांचे डोळे लागून राहिलेल्या मान्सूनबाबत दिलासादायक वृत्त आहे. केरळमध्ये मान्सून ४ जूनमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.
दिलासादायक.. यंदा सरासरीच्या ९३ टक्के मान्सून.. ४ जूनला केरळमध्ये होणार दाखल - स्कायमेट
मान्सून हा सरासरीहून कमी म्हणजे ९३ टक्क्यापर्यंत पडेल, असे स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या खासगी संस्थेने म्हटले आहे.
मान्सून हा सरासरीहून कमी म्हणजे ९३ टक्क्यापर्यंत पडेल, असे स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या खासगी संस्थेने म्हटले आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून २२ मे रोजी येईल. यापूर्वी दोन दिवस किंवा दोन दिवसानंतरही मान्सून तिथे येवू शकतो, असे स्कायमेटने हवामान अंदाजात म्हटले आहे.
मान्सून सर्वात कमी पूर्व व पूर्वोत्तरकडील भागात सर्वात कमी पडेल, असा स्कायमेटने अंदाज वर्तविला आहे. तर उत्तर-पश्चिम आणि दक्षिण भारतात मान्सूनची स्थिती चिंताजनक असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.