नवी दिल्ली - मोंडेलिज इंडिया फूड कंपनीकडून देशातील १२ मोठ्या शहरात ७१ टन बिस्किट आणि चॉकलेटचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटात अन्नाची समस्या अनेकांना भेडसावत आहे. कंपनीच्या उत्पादनांमुळे अनेकांना सहज अन्न मिळू शकेल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे.
मोंडेलिज इंडिया कंपनीने इंडिया फूडबँकिंग नेटवर्क आणि फूड सेक्युरिटी फांउडेशन इंडियाच्या मदतीने ३ लाख ६० हजार बिस्किटाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तर २३ लाख चॉकलेटचे वाटप करण्यात येणार आहे. कंपनीचे कर्मचारी आणि अक्षय पात्र फाउंडेशनच्या मदतीने १ लाख जेवणाचे वितरित करण्यात आले आहे. हे जेवणाचे वाटप एप्रिल २०२०पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.