विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नाही; एअर इंडियाने बुकिंग सुरू केल्यानंतर सरकारचे स्पष्टीकरण - Civil aviation
केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतरच विमान कंपन्यांनी तिकिट बुकिंग सेवा सुरू करावी, असा सल्ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.
एअर इंडिया
By
Published : Apr 19, 2020, 10:48 AM IST
नवी दिल्ली- एअर इंडियाने देश व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांसाठी तिकिट बुकिंग केल्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देश व विदेशात विमान उड्डाण सुरू करण्यार निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतरच विमान कंपन्यांनी तिकिट बुकिंग सेवा सुरू करावी, असा सल्ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.
एअर इंडियाच्या वेबसाईटवर तिकिट बुकिंग सेवा सुरू-
टाळेबंदी संपल्यांनंतर एअर इंडियाची बुकिंग सेवा ४ मेपासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची बुकिंग सेवा १ जूनपासून सुरू होणार आहे. देशात २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान टाळेबंदी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत देश-विदेशातील विमान उड्डाणे केंद्र सरकारने स्थगित केली आहेत.