महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 26, 2020, 8:24 PM IST

ETV Bharat / business

रंगाधळेपणा असला तरी मिळणार वाहन परवाना; वाहतूक मंत्रालयाची अधिसूचना

वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय मोटार कायदा 1989 मधील फॉर्म क्रमांक 1 व फॉर्म क्रमांक 2 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे सौम्य व मध्यम रंगाधळेपणा असलेल्या व्यक्तींना परवाना मिळू शकणार आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

नवी दिल्ली – वाहन चालविण्याकरता सिग्नलचे रंग कळणे ही प्राथमिक आवश्यकता असते. त्यामुळे आजवर रंगाधळेपणा असलेल्या व्यक्तींना वाहन परवाना मिळत नव्हता. मात्र, केंद्र सरकारने सौम्य आणि मध्यम रंगाधळेपणा असलेल्या व्यक्तींनाही वाहन चालविण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवान्याबाबत (ड्रायव्हिंग लायसन्स) अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेप्रमाणे वाहन परवान्याच्या नियमात सुधारणा होणार आहे. वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय मोटार कायदा 1989 मधील फॉर्म क्रमांक 1 व फॉर्म क्रमांक 2 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे सौम्य व मध्यम रंगाधळेपणा असलेल्या व्यक्तींना परवाना मिळू शकणार आहे.

वाहतूक मंत्रालयाने ही सुधारणा दिव्यांग नागरिकांना वाहतूक सेवा व वाहन चालक परवाना मिळण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. रंगाधळेपणा असलेल्या नागरिकांनी त्यांना वाहन चालक परवाना मिळत नसल्याबाबत मंत्रालयाकडे सादरीकरण (रिप्रेझेन्टेशन) केले होते. या समस्येबाबत वाहतूक मंत्रालयाने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला विचारात घेतला. त्यांच्या शिफारशीनंतर सौम्य आणि मध्यम रंगआंधळेपणा असलेल्या व्यक्तींना परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी परवानगी इतर देशातही देण्यात येत असल्याचे वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.

रंगआंधळेपणा म्हणजे काय असतो?

रंगाधळेपणा व्यक्तीला सर्वसामान्यांप्रमाणाचे दृष्टी असते. फक्त दोन भिन्न रंगातील फरक किंवा एखादा रंग ओळखता येत नसतो, अशी लक्षणे आढळून आल्यास रंगाधळेपणा म्हटले जाते. वैमानिक, अग्नीशमन दल आदी ठिकाणी रंग दृष्टी पाहूनच उमेदवारांना सेवेत घेतले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details