महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मायक्रोसॉफ्टने तयार केला नवा सुपरकॉम्प्युटर; 'हे' करणार काम - सुपरकॉम्प्युटर

मायक्रसॉफ्टने डेव्हलपर्सच्या परिषदेत नव्या सुपरकॉम्प्युटरची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने ओपएन आयमध्ये २०१९ ला १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : May 20, 2020, 12:57 PM IST

सीटल- मायक्रोसॉफ्टने नवा शक्तिशाली सुपरकॉम्प्युटर तयार केला आहे. त्यासाठी कंपनीने कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेमधील (एआय) ओपनएआय या स्टार्टअपसाठी भागीदारी केली होती. हा सुपरकॉम्प्युटर अझुरे या ठिकाणी एआयच्या मोठ्या मॉडेलला प्रशिक्षीत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

मायक्रसॉफ्टने डेव्हलपर्सच्या परिषदेत नव्या सुपरकॉम्प्युटरची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने ओपएन आयमध्ये २०१९ ला १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा-कोरोनाचे संकट : महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या जीडीपीवर होणार ६० टक्के परिणाम

अशी आहे सुपरकॉम्पुयटरची क्षमता

  • २ लाख ८५ हजार सीपीओ कोअर्स
  • १० हजार जीपीयू
  • नेटवर्कमधील प्रत्येक जीपीयू सर्व्हरला ४०० गिगाबाईट प्रति सेकंद कनेक्टिव्हटी

जगभरातील ५०० आघाडीच्या सुपरकॉम्पुटरमध्ये हा नवा सुपरकॉम्पुयटरचा पाचवा क्रमांक असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. अझुरे येथील हा सुपरकॉम्प्युटरमध्ये बळकट क्लाऊटची पायाभूत सुविधा आहे. त्यामध्ये शाश्वत डाटा सेंटर आहे.

हेही वाचा-फेसबुकसह इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शॉप सुरू करण्याची मिळणार सुविधा

ABOUT THE AUTHOR

...view details