महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Padma Bhushan award :पद्मभूषण पुरस्कार मिळणे अभिमानाची गोष्ट - मायक्रोसॉफ्टचे सीइओ - भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांना पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan award) देवून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सत्या नडेला यांनी भारतीय लोकांचे आभार मानले.

Satya Nadella
सत्या नडेला

By

Published : Jan 28, 2022, 4:24 PM IST

न्यूयॉर्क (अमेरिका) :मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला (Satya Nadella CEO of Microsoft) म्हणाले की, त्यांच्यासाठी भारत सरकारचा सर्वात मोठा तिसरा नागरिक पुरस्कार पद्मभूषण (Padma Bhushan to Satya Nadella) प्राप्त करने अभिमानाची गोष्ट आहे. तसेच त्यांना भारतीय लोकांसोबत काम करत राहायचे आहे. जेणेकरुन त्यांना प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत मिळू शकेल. भारत सरकारले देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गूगलचे सीएओ सुंदर पिचाई आणि टाटा समूह के अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पद्म भूषण देण्याची घोषणा केली होती.

नडेला यांनी ट्विट केले की, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणे आणि इतक्या असाधाराण लोकांसोबत ओळखले जाणे अभिमानाची गोष्ट आहे. मी राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि भारतीय लोकांचा आभारी आहे. भारतीय लोकांसोबत काम करत राहायला तत्पर आहे, जेणेकरून मी त्यांना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रगतीसाठी वापर करण्यास मदत करू शकेन. हैदराबाद मध्ये जन्मलेलो नडेला (Satya Nadella was born in Hyderabad) (54) यांना फेब्रुवारी 2014 मध्ये माइक्रोसॉफ्टचे सीइओ करण्यात आले होते. जून 2021 मध्ये त्यांना कंपनीच्या अध्यक्षपदीही नियुक्त करण्यात आले. या अतिरिक्त भूमिकेत, ते मंडळासाठी अजेंडा-सेटिंग कार्याचे नेतृत्व करतील.

देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात बुधवारी डिजिटल कार्यक्रमा दरम्यान अमेरिकेत भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू (Indian Ambassador Taranjit Singh Sandhu) म्हणाले होते की, या वर्षी, तीन प्रतिष्ठित परदेशी भारतीय सदस्यांना पद्मभूषण पुरस्कारासाठी निवण्यात आले आहे. ज्यामध्ये भारतीय पाककला लोकप्रिय करण्यासाठी मधुर जाफरी, तंत्रज्ञानातील नेतृत्वासाठी सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details