नवी दिल्ली -कोरोनाच्या संकटातही वाहन उद्योग क्षेत्रासाठी दिलासादायक वृत्त आहे. मारुती सुझुकी इंडिया आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) यांच्या वाहनांच्या विक्रीत मार्चमध्ये सुधारणा झाली आहे. या कंपन्यांच्या वाहन विक्रीत मार्चमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
मारुती सुझुकी कंपनीच्या माहितीनुसार मार्च 2021 मध्ये 1,67,014 वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी मार्चमध्ये 83,792 वाहनांची विक्री झाली होती. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या माहितीनुसार गेल्या महिन्यात 15,001 वाहनांची विक्री झाली आहे. हे मार्च 2013 नंतर देशातील वाहनांच्या विक्रीचे सर्वाधिक प्रमाण आहे. कंपनीने कोरोनाच्या काळात टाळेबंदी जाहीर झाली असताना मार्च 2020 मध्ये 7,023 वाहनांची विक्री केली होती.
हेही वाचा-जीएसटी संकलनाचा आजपर्यंतचा उच्चांक; मार्चमध्ये 1.23 लाख कोटी जमा
अशी झाली मारुतीच्या वाहनांची विक्री-
मिनी कार, अल्टो आणि एस-प्रेस्सोच्या वाहनांची मार्च 2021 एकूण 24,653 विक्री झाली आहे. तर कंपनीने मार्च 2020 मध्ये 15,988 वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात कॉम्पॅक्ट श्रेणीमध्ये स्विफ्ट, कॅलेरिओ, इग्नीस, बॅलेनो आणि डिझायरच्या 82,201 वाहनांची विक्री झाली होती. तर कंपनीने या श्रेणीमध्ये 40,519 कार मार्च 2020 मध्ये विकल्या आहेत.
हेही वाचा-तुम्ही सर्कस चालवित आहात की सरकार? काँग्रेसचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना टोला
इनोव्हा क्रिस्टा आणि न्यू फोर्च्युनरमुळे टोयोटाच्या वाहन विक्रीत वाढ-
टोयोटाच्या माहितीनुसार वैयक्तिक वापरासाठी वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये इनोव्हा क्रिस्टा आणि फोर्च्युअनर जानेवारीत लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे टोयोटाने गेल्या आठ वर्षात वाहन विक्रीत सर्वाधिक चांगली कामगिरी नोंदविली आहे. टीकेएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी म्हणाले की, कंपनीने जानेवारी- मार्चमध्ये वाहनांची विक्री ही सणासुदीच्या काळातील वाहनांची विक्री केली आहे.