महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'मारुती'ने गाठला मैलाचा दगड; २ कोटी प्रवासी वाहनांची विक्री

मारुती सुझुकीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनेची आयुकावा म्हणाले, या नव्या विक्रमामुळे आम्ही खूप भारावून गेलो आहोत. मैलाचा दगड गाठल्याने हे मारुती सुझुकी, पुरवठादार आणि डीलर पार्टनर यांच्यासाठी खूप मोठे यश आहे.

By

Published : Dec 1, 2019, 7:35 AM IST

Maruti Suzuki
मारुती सुझुकी

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने विक्री व्यवसायात 'मैलाचा दगड' गाठला आहे. भारतीय बाजारपेठेत मारुतीच्या एकूण २ कोटी प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे.

मारुती सुझुकीने पहिली मारुती ८०० ही कार १४ डिसेंबर १९८३ ला विकली होती. त्यानंतर कंपनीने सुमारे २९ वर्षानंतर एकूण १ कोटी वाहनांची विक्री केली. त्यानंतरच्या ८ वर्षातच १ कोटी प्रवासी वाहनांची विक्री केली.

हेही वाचा-'निर्मला सीतारामन यांना अर्थशास्त्र माहित नाही'

मारुती सुझुकीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनेची आयुकावा म्हणाले, या नव्या विक्रमामुळे आम्ही खूप भारावून गेलो आहोत. मैलाचा दगड गाठल्याने हे मारुती सुझुकी, पुरवठादार आणि डीलर पार्टनर यांच्यासाठी खूप मोठे यश आहे. मारुती सुझुकीने सीएनजी वाहने तसेच स्मार्ट हायब्रीड वाहनांचा कारखाना सुरू केला आहे. त्यामध्ये बीएस - ६ च्या सहा वाहनांच्या मॉडेलचे उत्पादन घेतले जाणार आहे.

दरम्यान, वाहन उद्योगावर वर्षभरापासून मंदीचे सावट असताना मारुतीच्या या कामगिरीने दिलासादायक वृत्त दिले आहे.

हेही वाचा-चेन्नई-निझामुद्दीन एक्स्प्रेस थांबवून रेल्वे पोलिसांनी केली तपासणी, कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details