नवी दिल्ली -ऑल्टो या मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक कारने 20 वर्षे पूर्ण केली असून इतक्या वर्षांत मारुतीने एकूण 40 लाख ऑल्टो विकल्या आहेत. ही कार सन 2000 मध्ये लाँच केली गेली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये मारुतीने 40 दशलक्ष ऑल्टोची विक्री पूर्ण करण्याचा टप्पा गाठला.
अत्यंत स्पर्धात्मक कार मार्केटमध्ये सलग 16 वर्षे ऑल्टो सर्वाधिक विक्री होणारी कार असल्याचे मारुतीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. मागील दोन दशकांत या हॅचबॅक कारमध्ये अनेक बदल झाले आहेत. सध्या, अल्टो ही भारतातील पहिली बीएस 6 कम्पलाएंट एंट्री लेव्हल कार आहे.