नवी दिल्ली- भांडवली बाजारात सहभाग घेणारे आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील अधिभार शुल्क मागे घ्यावे, अशी मागणी केली.
सध्या देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. अशा स्थितीमध्ये गुंतवणूक वाढावी व अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी एफपीआयमध्ये गोल्मॅन सॅच्स, नोमुरा ब्लॅकरॉक, सीएलएसए, बार्कलेज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अधिभार कर मागे घेण्याची मागणी केली. सीतारामन यांनी त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतले, मात्र कोणतेही आश्वासन दिले नाही.
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे प्रमाण शेअर बाजारात वाढवावे, असेही यावेळी सूचविण्यात आले. विदेशी गुंतणूकदार संस्थांसाठी असलेल्या केवायसीच्या नियमाबाबतही बैठकीत चिंता व्यक्त केली. उद्योगानुकलतेसाठी त्यात शिथीलता आणावी, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. मसाला बाँडवरील करही वगळावा, अशी मागणी करण्यात आली.