सॅन फ्रान्सिस्को- व्हर्च्युल रिअॅल्टी (व्हीआर) हेडसेटमध्ये अधिक वास्तवदर्शी डिजीटल अवतार आणण्याचे उद्देश असल्याचे कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले. यामध्ये डोळ्यांसह आणि चेहऱ्याचा मागोवा (ट्रॅकिंग) घेण्याचा समावेश असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले. त्यामुळे वापरकर्त्यांना साधनांमधून अधिक सामाजिक अनुभव मिळणे शक्य होणार असल्याचे मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेबर्ग पॉडकास्टमध्ये श्रोत्यांशी संवाद साधताना म्हणाले की, फेसबुकच्या ओकुलस व्हीआर हेडसेटडमध्ये वापरकर्त्याला प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव मिळू शकतो. आम्ही मुलभूतपणे सामाजिक कंपनी आहोत. आम्ही लोकांना एकमेकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामध्ये खासगी संदेशांसह अधिक व्हिडिओ, फोटो हे सामाईक करण्याचा समावेश आहे. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटत असल्याचा अनुभव देणे हा चांगला सामाजिक अनुभव ठरतो.
हे वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर 'जैसे थे'