महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मार्चमध्ये जीएसटी महसुलाचे प्रमाण १ लाख कोटीवर पोहोचण्याची शक्यता - जीएसटी

चालू आर्थिक वर्षात  १०.७० लाख कोटी जीएसटी महसूल गोळा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात जीएसटीचे उद्दिष्ट हे १३.७१ लाख कोटीवरून ११.४७ लाख कोटी निश्चित केले आहे.

संग्रहित

By

Published : Mar 22, 2019, 5:08 PM IST

नवी दिल्ली- आर्थिक वर्ष संपत असताना जीएसटी महसूल मार्चमध्ये १ लाख कोटींचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत. यामुळे वित्तीय तूट वाढत असताना अर्थव्यवस्थेला अंशत: दिलासा मिळणार आहे.

चालू आर्थिक वर्षात १०.७० लाख कोटी जीएसटी महसूल गोळा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात जीएसटीचे उद्दिष्ट हे १३.७१ लाख कोटीवरून ११.४७ लाख कोटी निश्चित केले आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये १३.७१ लाख कोटी जीएसटी जमा होईल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षात यापूर्वी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये जीएसटीने १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

अनु.क्र. जीएसटीचे प्रमाण महिना
९७ हजार २४७ कोटी डिसेंबर
१.०२ लाख कोटी जानेवारी


गृहप्रकल्पांना जीएसटी परिषदेने दिला आहे दिलासा-

जीएसटी परिषदेने २४ फेब्रुवारीला झालेल्या जीएसटीच्या बैठकीत बांधकामाधीन फ्लॅटवरील जीएसटी ५ टक्क्यापर्यंत कमी केला आहे. तर परवडणाऱ्या दरातील घरांवरील जीएसटी १ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची १ एप्रिलापसून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details