नवी दिल्ली -केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. 16 जूनपासून देशात सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य असेल. म्हणजेच ज्वेलर्स केवळ हॉलमार्क असलेलेच दागिने विकतील. हॉलमार्किंग 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने शिथिलता देत तारीख वाढवली होती. टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी केली जाईल आणि सुरुवातीला ही योजना 256 जिल्ह्यात राबविली जात आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
मंगळवारी 15 जूनला संध्याकाळी वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत ज्वेलर्सची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले की, ग्राहकांचे अधिक चांगले संरक्षण आणि त्यांचे समाधान करण्याचा सरकारचा सतत प्रयत्न असतो. 16 जून 2021 रोजी 256 जिल्ह्यांमध्ये सक्तीची हॉलमार्किंग राबविली जात आहे. या प्रकरणात ऑगस्ट 2021 पर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही.
...यांना हॉलमार्किंगमधून सूट